पाणथळ - एक परिचय

About Image 1
About Image 2

पाणथळ प्रदेश,निर्णायक नैसर्गिक संसाधनांपैकी एक आहेत. पाणथळ जागा म्हणजे जमिनीचे क्षेत्र जे तात्पुरते किंवा कायमचे पाण्याने झाकलेले असते. याचा अर्थ असा की, पाणथळ जमीन खऱ्या अर्थाने जलचर किंवा स्थलीय नाही; हे शक्य आहे की हंगामी परिवर्तनशीलतेनुसार ओलसर जमीन एकाच वेळी दोन्ही असू शकते. अशा प्रकारे, आर्द्र प्रदेश त्यांच्या उत्पत्ती, भौगोलिक स्थान, पाण्याची व्यवस्था आणि रसायनशास्त्र, प्रभावी वनस्पती आणि माती किंवा गाळाच्या वैशिष्ट्यांनुसार प्रचंड विविधता प्रदर्शित करतात. त्यांच्या संक्रमणकालीन स्वरूपामुळे, आर्द्र प्रदेशांच्या सीमा निश्चित करणे कठीण असते. तथापि, पाणथळ प्रदेश सर्व प्रकारांमध्ये सामाईक असलेल्या काही विशेषता सामायिक करतात. यापैकी, जलविज्ञान रचना (पाणी पुरवठ्याची गतिशीलता, थ्रुपुट, साठवण आणि तोटा) हे आर्द्र प्रदेश प्रणालीच्या स्वरूपासाठी सर्वात मूलभूत आहे..


पुढे वाचा

समितीची कार्ये

१) सदर समिती मा.उच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणीचे सनियंत्रण करील.

२) वेटलँड / पाणथळ क्षेत्राचा नाश होत असल्याबाबत जनतेमार्फत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास समिती जबाबदार असेल.

३) समितीने वेटलँड संदर्भात आवश्यक तक्रार निवारण यंत्रणा ६ सप्टेंबर, २०१६ पूर्वी उभारावी. समितीकडे नागरीकांना आपल्या लेखी तक्रारी नोंदविता येतील म्हणून ई-मेल अथवा व्हॉट्स एप तसेच दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करुन द्यावा. तसेच विभागीय आयुक्त यांनी सदर उद्देशासाठी स्वतंत्र संकेत स्थळ तयार करावे. अथवा विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातील संकेत स्थळाचा वापर करावा. सदर संकेत स्थळावर छायाचित्र upload करण्याची सुविधा असावी.

४) समितीकडे तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नावाची गुप्तता ठेवण्यात येईल तसेच निनावी तक्राराची देखील सदर समिती दखल घेईल.

५) समिती गठीत झाल्यानंतर विभागीय आयुक्त, कोंकण यांनी सदर समितीची पुरेशी प्रसिध्दी करावी. तसेच तक्रार निवारण यंत्रणेबाबत स्थानिक वृत्तपत्र, एफ. एम., आकाशवाणी (Redio), दूरदर्शन (T.V.) यांच्याद्वारे जाहिरात करावी.

६) तक्रार निवारण यंत्रणेबाबत कोंकण विभागातील प्रत्येक तहसिल कार्यालयात आवश्यक जाहिरात करणे आवश्यक आहे.

७) उपलब्ध माध्यमांपैकी कोणत्याही माध्यमांमार्फत तक्रार प्राप्त होताच, समितीने तात्काळ स्थळपहाणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा गट प्राधिकृत करावा. जर तक्रारदाराचे नाव, पत्ता व संपर्क माहिती उपलब्ध असल्यास, शासकीय अधिकारी स्थळपहाणी करणार असल्याबाबत तक्रारदारास कळवावे.

८) वेटलँड संदर्भात कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास त्याविरुध्द तहसिलदार अथवा इतर महसूल अधिकारी कारवाई करत असताना तेथील तालुका स्तरीय पोलीस अधिकारी यांनी सदर कार्यवाहीस सहाय्य करणे बंधनकारक असेल.

९) उपलब्ध माध्यमांपैकी कोणत्याही माध्यमांमार्फत तक्रार प्राप्त होताच, समितीने तात्काळ स्थळपहाणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा गट प्राधिकृत करावा. जर तक्रारदाराचे नाव, पत्ता व संपर्क माहिती उपलब्ध असल्यास, शासकीय अधिकारी स्थळपहाणी करणार असल्याबाबत तक्रारदारास कळवावे.

१०) सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या विकास योजना / प्रकल्पामुळे होणाऱ्या Wetland ऱ्हासाबाबत उपाययोजना शासनास सुचविणे व शासनाच्या निर्देशानुसार त्यावर अंमलबजावणी करणे, ही समितीची जबाबदारी असेल.

११) मा. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाची अंमलबजावणी करताना काही अडचणी उदभवल्यास विभागीय आयुक्त, कोंकण यांनी त्याबाबत शासकीय अभियोक्ता यांच्यामार्फत मा. न्यायालयास निदर्शनास आणून द्यावे.

१२) विभागीय आयुक्त यांनी समितीची महिन्यातून किमान एक वेळा बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा.

१३) सदर समिती कोंकण परिसरातील Wetland चे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता असणाऱ्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण सहकार्य करेल आणि राज्य स्तरावरील वेटलँड संनियंत्रण समितीला समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी सादर करील. सदर समिती मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणी व्यतिरिक्त नष्ट झालेल्या वेटलँड / पाणथळाच्या पुनःस्थापना (restoration) बाबतही कार्यवाही करेल.

१४) समितीने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अनुपालन अहवाल वेळोवेळी मा. उच्च न्यायालयास सादर करावा.